संदीप गुंड

               महाराष्ट्रात MISSION DIGITAL SCHOOL ची चळवळ चालवणारे  संदीप गुंड  
   

  पाडयावरील शाळेचे स्मार्ट पाऊल टॅबलेट फॉर स्कूल तंत्रस्नेही मित्रहो सदर अर्टिकल संपूर्ण वाचा आणि बनवा कमीत कमी किमतित आपलीही शाळा स्मार्ट . ✏आज सर्वच क्षेत्रात माहिती आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर होत असताना शिक्षण क्षेत्रही त्यास अपवाद नाही .गेल्या दशकापासून आधुनीक तंत्रज्ञानाच्या वापरातून शिक्षण क्षेत्रात अमुलाग्र बदल होताना दिसत आहेत. जागतिक स्तरावर शिक्षणाचा विचार करता पाश्चिमात्य शिक्षण व्यवस्थेच्या प्रगतिचे वैशिष्टये अत्याधुनीक ईंटअॅक्टीव्ह ई लर्निग प्रणालीच असल्याचे लक्षात येते.या प्रकारच्या ई लर्निंग प्रक्रियेत ईटरअॅक्टीव्ह तांत्रीक साधनांवर टचस्क्रीन या तंत्रज्ञानाच्या मदतीने विद्यार्थ्यांचा वैयक्तिक प्रतिसाद घेतला जातो .परंतु तुलनेने भारतीय शिक्षण व्यवस्थेत मात्र बहुतांश शाळांमध्ये नॉन इंटरएक्टिव ई लर्निग प्रणालीचाच सर्रास वापर केला जातो .संगणकतील मल्टीमिडियाच्या मदतीने फक्त पाहणे व ऐकणे इतपर्यन्तच ते मर्यादित असल्याचे दिसून येते ज्यात विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या क्रियेटिविटीला फरसा वाव नसल्याचे दिसून येत आहे.मात्र महाराष्ट्रातील एका पाडयावरील शाळा इंटरएक्टिव ई लर्निग या प्रणालीच्या यशस्वी वापरातून झाली आहे स्मार्ट शाळा.ठाणे जिल्ह्यातील शहापुर तालुक्यात सह्याद्रीच्या कुशीत वसलेला पष्टेपाडा या छोट्याश्या पाडयावरील शाळेने प्रोजेक्ट शिक्षा-शिक्षणासाठी तंत्रज्ञान या अभिनव उपक्रमा अंतर्गत स्मार्ट बोर्ड , इंटरएक्टिव प्रोजेक्टर ,इंटरएक्टिव मॉनिटर ,टेबलेट्स या टचस्क्रीन साधनांच्या प्रभावी वापरातून खडू फळा या पारंपरिक पद्धतीला छेद देत इंटरएक्टिव ई लर्निग मध्ये अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. चालु शैक्षणिक वर्षात शाळेने ��दप्तर ओझ्याविना शिक्षण -शिक्षणासाठी टॅबलेट हा अभिनव उपक्रम हाती घेतला व शिक्षणात टॅबलेट चा प्रभावी वापर करुन तळागाळातील ग्रामीण विद्यार्थिही कसे स्मार्ट होऊ शकतात हे सिद्ध केल आहे .दप्तर ओझ्याविना शिक्षण या अभिनव उपक्रमच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीत पुढील टप्पे अंतर्भूत होते. 1⃣सुरवातीला दहा इंच टच स्क्रीन टॅब्लेटची निवड करण्यात आली यात असणाऱ्या गूगलच्या एंड्राइड ऑपरेटिंग सिस्टममुळे या साधनास प्राधान्य देण्यात आले या ऑपरेटिंग सिस्टम चे क्षितिज इतके मोठे आहे की दररोज लाखो अप्लिकेशन गूगल प्ले स्टोर वर अपलोड केले जातात ज्या मधील 40% अप्लीकेशन शैक्षणिक असून मोफत डाउनलोड करुन इंटरएक्टिव पद्धतीन ऑफलाइन वापरता येतात . 2⃣उपक्रमच्या दसऱ्या टप्प्यात अभ्यासपूर्वक निवड केलेल्या टॅब्लेटची लोकसहभातुन प्रत्येक विद्यार्थ्याच्या दप्तारत समावेश करण्यात आला. 3⃣उपक्रमच्या प्रत्यक्ष अंमलबजवाणीत मात्र विद्यार्थ्यांमध्ये टॅबलेट हताळण्यासाठी आवश्यक असणारा आत्मविश्वास आणि कौशल्य निर्माण करण्यासाठी गूगल प्ले स्टोर वरील मोफत उपलब्ध असलेल्या शेकड़ो खेळ स्वरूपातील इंटरएक्टिव शैक्षणिक अप्लिकेशन्स वापरण्यात आले .प्रत्येकाच्या टॅबलेट मध्ये विद्यार्थ्याच्या इयत्ते नुसार विविध शैक्षणिक अप्लिकेशन्स टाकण्यात आली.यात विशेषतः लर्न मराठी ,जादूची बालवाडी, ई स्लेट, एबीसीडी रायटिंग, नम्बर फॉर अ किड्स, मैथ्स फॉर अ किड्स ,प्री प्रायमरी इंग्लिश,बेसिक ऑपरेशन, ईग्लीश व्हक्याबलरी,डिक्शनरी,किड्स मैथ,पझ्झल,क्विझ्,किड्स स्कूल्, ई लायब्ररी,अनमोल गोष्टी,किड्स ड्रॉइंग यांसारख्या शेकडो अप्लिकेशन्सचा वापर करुण प्राथमिक शिक्षणात आवश्यक असणारी गणिती प्राथमिक क्रिया,लेखन वाचन, इंग्रजीचा शब्ध संग्रह,संभाषण यांसारखी कौशल्य विद्यार्थ्यांना अगदी सहज खेळस्वरुपात आवगत होऊ लागली. 4⃣विद्यार्थाच्या पाठीवारील व मनावरील ओझे कमी करण्यासाठी प्रत्येक इयत्तेच्या पुस्तकांचा पी डी एफ च्या स्वरूपात टॅबलेट मध्ये समावेश करण्यात आला असून स्मार्ट बोर्ड प्रमाणे पुस्तकांमधील सर्व अक्टिविटी विद्द्यार्थी आपअपल्या टॅबलेट वर सोडवतात. या सोडवीलेल्या अक्टिविटी स्क्रीन शॉट घेऊन एका फोल्डर मध्ये सेव केल्या जातात ज्यास डिजिटल संचिका म्हणून संबोधले जाते.या फोल्डर मध्ये विद्ध्यर्थ्यांनी स्क्रीनवर सोडवलेला स्वध्याया बरोबर कैमेऱ्याचा व स्कैनरचा वापर करुन संबधीत विद्यर्थ्याच्या कला गुणांचे फुटेज तोंडी परिक्षांचे फुटेज तसेच सीसीई च्या इतर तंत्राचे ही डिजिटल रिकॉर्ड ठेवले जाते ज्यामुळे मूल्यमापनात वस्तुनिष्ठता व विश्वासहर्ता वाढली आहे. 5⃣अध्ययन अध्यापन अधिक रंजक आणि प्रभावी व्हावे यासाठी स्वतः विद्द्यर्थ्यानी व शिक्षकांनी बनावलेल्या कंटेंट चा प्रभावी वापर केला जातो. 7⃣प्रत्यक्ष अध्यापनात शिक्षकांचा मास्टर टॅबलेट प्रोजेक्टरला कनेक्ट केला जातो आणि विद्यार्थ्यांचे टॅब्लेट्स राउटर च्या माध्यमातून वाय फाय ने मास्टर टॅबलेटशी जोडले जातात ज्यातून प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रोजेक्टरच्या मोठ्या स्क्रीनवर वैयक्तिक प्रतिसाद घेतला जातो. ज्यामुळे खऱ्या अर्थाने सुरु झाले इंटरएक्टिव अध्य्यन अध्यापन. 8⃣सदर उपक्रमच्या यशस्वी अंमलबजवाणीनंतर विविध मूल्यमापन तंत्रातून काही निष्कर्ष समोर आले. ��विद्द्यार्थयाच्या कृतियुक्त सहभागामुळे शिक्षण सहज आनंददायी आणि चिरंतर टिकणारे होते. ��ज्ञानरचनावादी विद्यार्थीकेंद्रित तसेच विद्द्यार्थि आग्रहीत ही पद्धति आहे. ��विद्द्यार्थांची अभ्यासातील रूचि वाढते अभ्यासात अधिक व्यस्त राहून स्वयं अध्यानास चालना मिळते. ��विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक उपस्थितीत वाढ होते. ��विद्द्यर्थ्याच्या त्वरित व चिकित्सक प्रतिसादामुळे मूल्यमापन प्रक्रिया अधिक सोपी झाली आहे . ��एकाच वेळी पाहणे ऐकण व कृतिचाही समावेश असल्याने विदद्यार्थ्यांच्या एकाग्रतेत परिणामी ज्ञानग्रहण करण्याच्या क्षमतेत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येते. ��कृतियुक्त असणाऱ्या प्राथमिक शिक्षणाची उद्दीष्ट साध्य करण्यासाठी संदिप गुंड सर साभार (9273480678)                         टँबलेट शाळा संकल्पना मित्रहो नमस्ते , आपल्या पष्टेपाडा शाळेच्या टॅबलेट फॉर स्कूल या अभिनव उपक्रमा विषयी मागील आठवडयात एक article मी whats app वर share केले होते ..त्यातून अनेक शिक्षक मित्रांच्या टॅबलेट शाळेसाठी साधनांची निवड ? यांसारख्या प्रश्नावर समाधान म्हणून मी माझ्या अनुभवातुन  खलील माहिती  आपल्याशी share करत आहे................ ...............��टॅबलेट शाळेसाठी कशी कराल टॅबलेटची निवड ?                  ��आवश्यक specification..........  1⃣Screen size किमान 7 इंच  ते 10 इंच एवढी असावी . 2⃣ Inner memory 4 to 16 gb 3⃣ Ram 1 or 2 gb  4⃣projector आणि Tv वर टॅबलेटची स्क्रीन share करण्यासाठी HDMI support आवश्यक..(अर्थात projector आणि Tv ला HDMI आवश्यक)            5⃣मीरा कास्ट या साधनाने wireless स्क्रीन share करण्यासाठी आपल्या टॅबलेट मध्ये screen mirror हे function असणे आवश्यक....................................                         वरील specifications नुसार बाजारातील लेटेस्ट iball company चा BRASX -1हा 10 इंच hdmi support असलेला 17000 हजार रुपयांचा टॅबलेट  तसेच sony dx 100 हा hdmi support असलेला 27000 हजार रुपयांचा projector ची निवडकरून केवल 45000 ते 50000 रूपयांमध्ये आपण interactive Elarning सुरु करू शकता ..मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांच्या हातात टॅबलेट देण्यासाठी  iball चा q40 या केवल 4000 रु किमतीच्या 7 इंच  टॅबलेटची निवड आपणास करता येईल . मित्रहो टॅबलेटच्या प्रभावी वापरासाठी मी माझ्या विद्यार्थ्यांच्या  टॅबलेटमध्ये ईयत्तेनुसार टाकलेले 101 selected interactive android educational apps जे आपल्याला play store वर मोफत उपलब्ध आहेत. 

No comments:

Post a Comment